2024 Gift Tractor Yojna Manjuri

Tractor Yojna Manjuri राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी आणि मोठ्या प्रमाणात मागणी असलेली योजना म्हणजे कृषी यंत्रीकरण योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर 4 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Tractor Yojna Manjuri चला तर सुरू करूया

Tractor Yojna Manjuri

Tractor Yojna Manjuri

कृषी ड्रोन अनुदान योजना

Tractor Yojna Manjuri :- राज्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कृषी यंत्रीकरणाकडे कल आहे शेती आधुनिक पद्धतीने केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदान तत्वावरती हे कृषी अवजार खरेदी करता यावेत यासाठी कृषी यांत्रीकरण उपा अभियान राबवलं जातं मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात यांत्रीकरणाकडे कल असल्यामुळे राज्यातील लाभार्थी जे शेतकरी आहेत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि याच्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये सर्व शेतकरी पात्र होत नाहीत आणि अशा शेतकऱ्यांना या यंत्र अवजाराच्या अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना राबवली जाते आणि याच योजनेला 2024-25 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे   2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये ही योजना राबवण्याकरता 250 कोटी रुपयांची तरतूद ह्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली असून या 250 कोटी रुपयांपैकी 60% निधीचा वापर करून ही योजना 2024-25 मध्ये राबवण्याकरता 150 कोटी रुपयांच्या निधीसह  ..ही योजना राबवायला प्रशासकीय मान्यता ही 4 जुलैच्या 2024 च्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेली आहे परंतु   ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देत असताना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा जो दर आहे तो मात्र कायम ठेवण्यात आलेला आहे   यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतले की ऑक्टोबर 2023 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही कृषी यंत्रीकरणाच्या अंतर्गत अवजार आहे ट्रॅक्टर आहे याच्या दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्या संदर्भातील निर्देश देण्यात आलेले होते डिसेंबर 2023 मध्ये सुद्धा सर्व राज्य शासनाला याच्या संदर्भातील पत्र देण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमवरती राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा ट्रॅक्टर साठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करून पाच लाख रुपया पर्यंत अनुदान मर्यादा करण्यासाठी मंजुरी दिलेली होती परंतु महाडीबीटी वरती अवजाराच्या या अनुदानाची परिगणना वगैरे सारे बदल करणं आवश्यक असल्यामुळे हे अनुदान अद्याप 5 लाखापर्यंत करण्यात आलेलं नव्हतं तर जो काही परिपत्रक जीआर काढण्यात आलेला होता तो मागे घेण्यात आलेला होता आणि आता 1 एप्रिल 2024 पासून हे पाच लाख रुपयाचा अनुदान लागू होईल अशा प्रकारे शेतकऱ्यांना या ठिकाणी अपेक्षा होती परंतु  हा जीआर निर्गमित करत असताना जे दिलं जाणार अनुदान आहे ते मात्र अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूद्रक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच 50% किंवा जास्तीत जास्त सव्वा लाख या मर्यादेमध्ये देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले असून सर्वसाधारण प्रवर्ग बहुबोधक शेतकरी जे असतील यांना 40% किंवा जास्तीत जास्त 1 लाख याच प्रमाणामध्ये देण्यासाठी या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी होणारा उशीर कारण आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये इच्छुक शेतकरी जास्त आहेत अर्ज केले जातात अर्ज लवकर पात्र होत नाहीत कारण इच्छुक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे अर्ज केल्यानंतर लवकर पूर्वसंमती मिळत नाही आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर यंत्र अवजार खरेदी केल्यानंतर निधीची उपलब्ध नसल्यामुळे अनुदानाचं वाटप ही होतं नाही आणि शेतकरी जास्त पात्र न करता प्रत्येक वर्षी अनुदान हे स्पिल ओवर म्हणजे तरतूद केलेला निधी सुद्धा पुढे पुढे ढकलला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये 250 कोटी रुपयांची तरतूद यापैकी 150 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता आणि याच्यामध्ये अनुदान दिलं जाणार कमी याच्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेकडे आता थोडासा कल कमी होताना दिसत आहे तर केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अशा योजना राबवल्या जात असताना दिल्या जाणाऱ्या ज्या अनुदानाचे गणना आहे ते वाढवण्यात यावी आणि केंद्र शासनाचा नवीन अनुदानाचा जो निकष आहे दर आहे तो लागू करून या योजना राबवाव्यात अशीच एक अपेक्षा आहे तर  तुरतास तरी जुन्याच अनुदानाच्या दरानुसार 4 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कृत कृषी यांत्रीकरण योजना ही राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे   हा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेत स्थळावरती पाहू शकता आणि ही माहिती इतरांना शेर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन करा धन्यवाद.

Leave a Comment