Sanjay Gandhi Niradhar Yojna-संजय गांधी निराधार योजना

नमस्कार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व निराधार लाभार्थ्यांपैकी फक्त याच निराधार लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरणासंबंधी जीआर शासनाकडून काढण्यात आला आहे तसेच इतर सर्व लाभार्थ्यांसाठी या ऑक्टोबर महिन्यापासून विशेष सूचना या जीआर मध्ये देण्यात आल्या आहेत त्यासाठी ही माहिती लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे त्या अगोदर आपण जर नवीन असाल तर ग्रुपला जॉईन करून ठेवा जेणेकरून असेच माहितीपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच कालच निर्गमित करण्यात आलेला हा शासन शासन निर्णय आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojna

नमो शेतकरी योजना 5 वा हप्ता लवकरच लिंकला क्लिक करा 

Sanjay Gandhi Niradhar Yojna

सदर शासन निर्णय पहा काय आहे सन 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 475 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून रुपये 205 कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयांव वितरित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम 34 कोटी 83 लाख 79379 रुपये या शासन निर्णयांव सोबतच्या विवरण पत्राप्रमाणे वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे आता विशेष सूचना लक्षात घ्या मित्रांनो तर पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल द्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे सप्टेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर करण्यात येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना आहे ऑक्टोबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल द्वारेच करण्यात येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल मित्रांनो की या ऑक्टोबर महिन्यापासून पुढील सर्व अर्थसहायाचे वितरण डीबीटी पोर्टल द्वारेच केले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ? लाडका शेतकरी योजना ! जाणून घ्या संपूर्ण माहिती 

तशा सूचना जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत त्यासाठी तुम्ही तुमचे बँक खाते आधार संलग्न आहे की नाही हे तपासून घ्या कारण पुढील सर्व वितरण हे डीबीटी पोर्टल द्वारेच होणार आहे आता पुढील माहिती पहा आता या वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे म्हणजे ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी जितकी लिस्ट पाठवली आहे त्यानुसार हे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे तर अशाप्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदान वितरणासंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण सदर माहितीच्या माध्यमातून पाहिली.
धन्यवाद .
आणि अश्याच महत्वपूर्ण माहिती साठी
व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.

1 thought on “Sanjay Gandhi Niradhar Yojna-संजय गांधी निराधार योजना”

Leave a Comment