Ration Card 5 Schemes-रेशन कार्ड च्या 5 योजना

नमस्कार  रेशनकार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांसाठी आता नवीन पाच योजना सुरू करण्यात आले आहेत या योजनांची अंमलबजावणी पंधरा तारखेपासून करण्यात येणार आहे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर नक्कीच तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी ठरणार आहे या पाच योजना खास करून पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषय ठरणार आहेत. तर काय आहेत या योजना याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती Ration Card 5 Schemes-रेशन कार्ड च्या 5 योजना आज आपण जाणून घेणार आहोत.

Ration Card 5 Schemes

 

रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिकेचे महत्त्व आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तींना दर महिन्याला मोफत रेशन देण्यात येते जेणेकरून त्यांच्या दररोजच्या जीवनात अन्नधान्याच्या बाबतीत थोडा हातभार लागेल व गरीब कुटुंबांना थोडाफार आधार मिळेल. या महिन्याच्या म्हणजेच 15 तारखेपासून या 5 नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे या 5 योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्यांचा फॉर्म कसा भरायचा तसेच अटी शर्ती काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी पाच नव्या योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत एक गोष्ट लक्षात घ्या की या योजना फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहेत. या योजनेच्या माध्यमातून नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. तर पहा या पाच योजना कोणत्या आहेत.

1.  शिलाई मशीन

महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या व गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून या उद्देशाने सरकारने महिलांसाठी शिलाई मशीन ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांसाठी मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार असून आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच शिलाई मशीन या योजनेचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे तर आता हा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत याबद्दल समोर माहिती आपण पाहणारच आहोत तर मित्रांनो ही जी शिलाई मशीन योजना आहे याचा फॉर्म ऑनलाईन पणे तुम्हाला अचूकपणे भरायचा आहे जेणेकरून पूर्णपणे तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरण्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही शिलाई मशीन या योजनेसाठी तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असावे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.

 

2.  घरकुल योजना

घरकुल योजना याविषयी तर सर्वांनाच माहिती असेल परंतु या योजनेसाठी अशी पात्रता ठेवण्यात आली आहे की ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा फॉर्म हा दिला जाणार आहे कारण की पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर सरकारला हे समजण्यास मदत होईल की तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी आहे त्यामुळे तुम्हाला उत्पन्न सर्टिफिकेट सुद्धा काढण्याची आवश्यकता या ठिकाणी लागणार नाही तुमचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हेच तुमच्या उत्पन्नाचा दाखला असे या ठिकाणी गृहीत धरले जाते. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ हा मिळू शकतो.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 ₹ जाणून घ्या  मुख्यमंत्री वयोश्री योजना येथे क्लिक करा 

3.  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजनेची जी अंमलबजावणी झाली तर त्याला सलग्न अशी ही योजना आहे परंतु या योजनेविषयी खूप लोकांच्या मनामध्ये भरपूर शंका आहेत जसे की तुम्हाला माहीतच असेल की तीन गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहेत मग हे मोफत सिलेंडर कोणाला मिळतील. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत या ठिकाणी दिले जाणार आहेत कारण की सामान्य माणसांना गॅसचे दर परवडणारे नसल्याने त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचे फॉर्म ऑनलाईन पणे भरायचे आहेत याचा जीआर सुद्धा आला आहे आता यामध्ये एक सर्वात मोठे अडचण आहे ती म्हणजेच पात्रता यामध्ये गॅस जोडणी फक्त महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे तर घरातील पुरुषाच्या नावावर गॅस जोडणी असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच प्रधानमंत्री योजनेमध्ये पात्र ठरलेले लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील मित्रांनो एका कुटुंबामध्ये केवळ एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ देण्यात येईल तसेच 14.2 किलोग्रॅम वजनाचे सिलेंडर ज्या कुटुंबाकडे असेल ते कुटुंब देखील या योजनेसाठी पात्र असतील.

4.  पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना

पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना या दोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपयांची मदत सरकारच्या माध्यमातून देण्यात येते तर या योजनेसाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारची विशेष योजना आहे. यासाठी पूर्णपणे भारत सरकारकडून निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत सर्व भू-धारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक ६००० रुपयांचं सहाय्य दिलं जात. पीएम किसान योजनेत आतापर्यंत 14 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत शेती करणाऱ्या शेतकरी मालकांना या योजनेचा लाभ मिळतो. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक हप्त्यांमध्ये निधी दिला जातो. एका वर्षात 6 हजार रुपये मिळतात. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये उपलब्ध आहेत. 4 महिन्यांत एक हप्ता जारी केला जातो. पण, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर PM-Kisan योजनेसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे.

या योजने साठी कागद पत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • जमिनीच्या मालकीची कागदपत्रे
  • बँक खाते माहिती (खात्याचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड)
  • आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक

5.  संजय गांधी निराधार

संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार अपंग तसेच घटस्फोटीत आणि विधवा अशा व्यक्तींना महिन्याला योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात परंतु यामध्ये एक अट आहे की तुमचे उत्पन्न 21,000 रुपये स्नेह आवश्यक आहे तसेच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अर्ज कसा करावा अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार कार्यालय /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.

किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance

5 thoughts on “Ration Card 5 Schemes-रेशन कार्ड च्या 5 योजना”

Leave a Comment